नवे लेखन (Latest)


ऐक रे सैफ (आणि तुझ्या सारखे आपले स्टार वलय मिरवणारे ५० नवकलाकार ) ..
ह्या इसमास... अजुनही पद्मश्री नाही .. आणि गरज पण नाही ...
३ राष्ट्रिय पुरस्कार विजेता .. (क्रांतिवीर,परिंदा,अग्नि साक्षी )
४ फिल्म फेयर पुरस्कार विजेता .. ( परिंदा,अंगार,क्रांतिवीर,अपहरण )
वय वर्ष ६१ आणि भारतासाठी शुट्टिंग मधे ओलिम्पिक मधे प्रतिनिद्धित्व करायचे स्वप्न ...
पहिला चित्रपट घर गहाण ठेवून बनवला ...
फ़क्त आदरापोटी विनामुल्य मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतो ..
आई वडिल हे क्रिकेटपटु / अभिनेत्री आहे म्हणून नाही तर स्वतः च्या कर्तुत्वावर मोठा झालेला
हा विश्वनाथ पाटेकर उर्फ़ नाना ...
फ़क्त नाना ...ना पद्मश्री ना पद्मभूषण ..कारण नेत्यांच्या मागे पुढे जावून धातूच्या बाहुल्या जमवायची हौस नाही ह्याला ...

उद्या काय अभिषेक बच्चन,उदय चोप्रा,तुषार कपूर हे पण पद्मश्री होतील ... त्याला काय
लागतं ...
विशेष टिप : मराठी शिका आणि कधी मराठी नाटक बघायला या. अथवा कथकली बघायला केरळ मधे जा म्हणजे अभिनय काय हे समजेल ...

No comments:

Post a Comment