Wednesday, 30 July 2014

पुणेरी पुणे ५२...


पुणे ५२ -

नावावरून तसा काहीच विशेष बोध न होणारा सिनेमा म्हटला कि आपल्याला तो विशेष वाटू लागतो. सिनेमाची release date हि १२. १२. १२ होती त्यामुळे साहजिकच हा सिनेमा पहायची उत्सुकता जास्त होती. काही दिवसांपूर्वी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता हा सिनेमा पहिला.  'नॉआर फ़ील्म' या प्रकारात हा सिनेमा येतो (म्हणजे काय?)
 सिनेमाचा काळ हा ९०-९५ च्या दशकात घेऊन जातो (तसं नसतं तरी काही विशेष फरक पडला नसता म्हणा). अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) नावाच्या detective (तो हि पुण्यात राहणारा!!) ची हि कथा म्हणजे त्याच्या आयुष्यातील काही घडामोडी आणि 'त्या' घडामोडींचा अमर च्या व्यक्तिगत आयुष्यावर होत जाणार 'परिणाम'. अमरचं love marriage. त्याची बायको प्राची (सोनाली कुलकर्णी Sr. and my favorite) हिने त्याच्या typical घरेलू housewife चं काम अतिशय सुंदर केले आहे. अमर ला 'job' नसल्याने तिची पैशासाठी होणारी चिडचिड, आईशी बोलताना अमर ची बाजू घेणे, अमरवर असलेलं  प्रेम, बायकी राग, भांडण या सगळ्या emotions तिने खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत. (अमर च्या character ला यामुळेच कदाचित जास्त धार आली असावी)

                स्वभावाने साधा आणि सरळ असणारा अमर बायकोच्या किट्किटिला कंटाळतो. त्याला extra marital affairs  चे पुरावे शोधण्याची केस मिळते. त्यातून पैसेही मिळतात पण पोलसांकडून सुटण्यासाठी त्याला तेच पैसे द्यावे लागतात. (इन्स्पेक्टर चं काम छोटच पण अप्रतिम I think he is Shrikant Yadav) म्हणजे एवढी मेहनत करूनही हाती काहीच नाही. यातून नेहाची (सई ताम्हणकर) केस घेतल्यानंतर अमर हळूहळू तिच्यामध्ये गुंतत जातो. प्राची त्याचा इगो प्रचंड दुखावते. अमर नेहा कडे जातो आणि त्याचा पाय घसरतो (इथे काही scenes मध्ये intimacy दाखवली गेली आहे पण तीही फक्त गरज म्हणून. Good  निखिल ) त्यातून पुढे त्याच्या मनाचा गोंधळ वाढत जातो. ती चिडचिड, तो guilt गिरीश कुलकर्णी ने खूप छान साकारला आहे. तो guilt वाढत जाताना दिग्दर्शक म्हणून निखिल महाजन याने केलेले बदल खूप सूचक आहेत. पुढे त्याला होणारे भास आणि नेहाचं रहस्य उलगडत जातं (?) अशाच एका ठिकाणी सिनेमा येउन संपतो.


                सिनेमामध्ये कॅमेरा angles खूप छान वापरलेत. त्याचं नाणं, पक्ष्याचं घरटं यासारखे symbols गूढ effect आणतात.  डार्क आणि gray shade चा वापर अमरची मनस्थिती दाखवण्यात केला आहे.  globalization मुळे गिरीश बदलतो यापेक्षा त्याच्या स्वतःकडून असणार्या अपेक्षा, स्वप्न, जबाबदार्या आणि गुंतलेलं, गोंधळलेलं मन यामुळे तो बदलतो हे कारण जास्त संयुक्तिक वाटतं. नेहाच्या 'exit' नंतर सिनेमा आता थांबेल आता थांबेल असा वाटून जातं. पण दिग्दर्शकाला उघाच त्याच्या आयुष्यात पुढे काय होईल हे दाखवायची  (आणि पर्यायानं आपल्याला बघायची) excitement आवरता आली नाही. "आता detective म्हटल्यावर हाणामारीचे प्रसंग असायलाच हवे, तो नंतर पोलिसांसोबत काम करतो, पैसेवाला होतो" - हे समीकरण देखील बळच दिल्यासारखं वाटतं. पण त्याचा, घराचा, family चा एकूण  changeover दाखवताना वापरलेलं VFX  आणि Animation मस्त वाटतं. हाणामारीची काही दृश्ये - camera आणि editing मधल्या  'effects' मुळे एखाद्या hollywood पटासारखी वाटतात (हेच विशेष)

          Background score, theme music छान जमलय. सुरवातीला दाखवलेले shadow मधले shots गूढता निर्माण करतात. पण पूर्ण सिनेमाभर ती नाही.  (दिग्दर्शकाला तशी गरज वाटली नसेल म्हणा पण detective चा सिनेमा म्हणून आपली एक इच्छा… बास…) अमर जर detective नसता तर प्रेक्षक त्याच्याशी जास्त relate करू शकले असते का?? अमरचा तणाव इतका जास्त वेळ का दाखवला?? "Find the hero within you" अशी tagline का?? असे काही छोटे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन निखिल ने सिनेमा संपवला आहे (का?)

विशेष : अमर रात्री बायको शेजारी झोपलेला असताना त्याच्याच कॉटवर शेजारी आपल्याला नेहा सुद्धा दिसते या क्षणी घेतलेला टॉप angle pan shot खूप भारी झालाय. सर्वच पात्रांचे अभिनय उत्तम. कमी artists मध्ये केलेला हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा एकवेळ बघण्यासारखा नक्कीच आहे.  
Youtube लिंक पुणे ५२ - तुमचे views कळवा.


Director: Nikhil Mahajan
Cast: Sonali Kulkarni, Girish Kulkarni, Sai Tamhankar, Bharti Achrekar, Kiran Karmarkar

Friday, 27 June 2014

"The World Before Her" : Review through my eyes


 "The World Before Her" -


               बरंच ऐकल होतं  या documentary फिल्म बद्द्ल. Youtube वर काही विडीओ पाहीले. त्यातल्या एका क्लिप मध्ये "अनुराग कश्यप " म्हणतो की the title says everything. पण या title चे २ अर्थ निघतात. पहिलं impression  हे होतं की 'before her' म्हणजे 'तिच्या आधी भूतकाळात' काही घडलं असावं . दुसरा अर्थ असा की 'before her' म्हणजे 'तिच्या समोर' असलेलं जग.

Director आपलयाला २ कथा दाखवते. दोन्ही कथा 'मुली किवा बाईचं जग' यावर आधारित आहे. कथा म्हणण्यापेक्षा आपण त्याला सत्यकथा म्हणूया. ही एक documentary असल्याने यातील ९०% shooting हे सत्यपरिस्थितीत केले आहे असे दिसते. कथा A ही सुरु होते 'प्राची त्रिवेदी' नावाच्या एका साध्या दिसणाऱ्या मुलीच्या मोनोलोगने. आपल्या देशाची संस्कृती टिकवायचं  तिचं स्वप्न आहे.त्यानंतर आपल्याला कथा B  दिसते. 'रुही सिंग' नावाची फेमिना मिस इंडिया च्या contest मध्ये जाऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणारी modern विचारांची  मुलगी दिसते. तिच्या parents चा तिला असलेला support दिसतो. हजारों मधून select झालेल्या २० ललना त्या एका मोठ्या हॉटेल मध्ये contest च्या प्रशिक्षणा साठी एकत्र येतात.

           कथा A मध्ये 'दुर्गावाहिनी' या 'विश्व हिंदू परिषदे'च्या एका महिला प्रशिक्षण कॅम्प (??) ची आपल्याला ओळख होते. प्राची या कॅम्प मध्ये काही वर्षांपासून शिकवते. दोन्ही कथांमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे स्वप्न, ध्येय, being independent, fight,creating identity. दोन्ही कथांमध्ये त्या त्या कॅम्प मधल्या मुलींचा दिवस पहाटे ४ ला सुरु होऊन रात्री उशिरा संपतो. प्राची च्या कथेमध्ये आपल्याला सुरवातीला पूजा-अर्चा, संस्कार वगेरे गोष्टी दिसतात. त्याच बरोबर ज्या गोष्टी आयुष्यात कधीच केल्या नाहीत ऐकल्या नाहीत हे त्या ८-१८ वयोगटातल्या मुली किती निरागसपणे अनुभवत असतात ते दिसतं. स्वसंर्क्षणाचे धडे घेताना त्यांची उत्सुकता, excitement हि कॅमेऱ्याने अचूक टिपली आहे. आपण हळूहळू त्या कथेमध्ये involve होत जातो.  दुसऱ्या कथेकडे जातानाचे transition खूप सुंदर आणि consistently जाणवते. तिकडे fasion world मधल्या मुली किती मेहनत घेत असतात आणि त्यांना एका 'स्वप्नासाठी' काय काय करावे लागते हे स्क्रीन वर बघणेच चांगले. त्यामागे त्यांची निष्ठा, passion, hardwork, dedication, इच्छाशक्ती या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. (मलाही हे पाहिल्यांदाच कळालं  आणि त्या ललनां बद्दल एक respect  मनात तयार झाला. ) 

          त्यांना प्रशिक्षणात चेहरा, उभार, नितम्ब, पोट, पाय इ. अशा शरीराच्या प्रत्येक भागावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. (प्रसंगी चेहरा १/३ होण्यासाठी शस्त्रकीया सुद्धा करून घ्यावी लागते) फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही त्यांना 'prepared' राहावे लागते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'शरीराचा' 'योग्य' वापर करणे हा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. मग आवडत नसलं तरी 'Bikini' घालून लोकांसमोर जाणं, शरीर दाखवणं हे करावंच लागतं. 'त्या' एका स्वप्नासाठी हि एवढी किंमत त्यांना मोजावी लागते. (आपण त्या मुलींच्या, रुहीच्या आयुष्याशी एकरूप झालेलो असतो त्यामुळे बिकिनी सीन पाहताना कुठल्याच प्रकारची आंबट प्रतिक्रिया मनात उमटत नाही.)

          इकडे प्राची च्या घरचे strict वातावरण दिसते. तिला स्वतःची मते मांडू दिली जात नाहीत. वडिलांच्या धाकात २३ वर्षे काढली. तिला लग्न करायचे नाही 'परिषद' हेच तिच आयुष्य आहे असं ती मानते. पण त्यावरून तिचे वडिलांशी वाद आणि भांडणं होत असतात. तिचे वडील तिला आणि कॅम्प मधल्या इतर मुलींना  मुस्लिम आणि ख्रिश्चन विरोधाचे संस्कार (??) देत असतात. मुस्लिमांना शूर्पणखा आणि ख्रिश्चनांना पुतना बाई ची त्यांनी दिलेली उपमा हास्यास्पद वाटते. पण त्याच बरोबर त्या लहान मुलींवर कुठले संस्कार होतायेत याची आपल्याला जाणीव होते. ते बिनधास्त पणे या दोन्ही धर्माविरुध्द वागायची शिकवण देतात.(कि स्वत:चा राग व्यक्त करतात?? हिंदू धर्म अशीच शिकवण देतो असा त्यांचा समज असावा.)

          प्राची म्हणते कि  आम्हाला sulfuric acid वगेरे दिलं  तर आम्ही bomb चं पण प्रशिक्षण देऊ. धर्माच्या रक्षणासाठी (मुस्लिम आणि ख्रीश्चनां विरुद्ध) ती काहीही करायला तयार आहे.(यावरून तिला bomb बनवायची 'कला'ही अवगत आहे असं कळतं) पण हा terorist camp नाही असं ती म्हणते. (वस्तूश्निष्ठपणे  नसेल पण वैचारिक level वर सगळं extremist fundamentalist camp प्रमाणेच दिसतं )
त्रिवेदी कुटुंब (प्राची आणि तिचे वडील) हेच स्व-संरक्षणाच्या गोंडस नावाखाली कॅम्प चालवत आहेत.हिंदू धर्माची शिकवण(??) द्यायची या कुटुंबाने  मक्तेदारी घेतली आहे असे वाटून जाते. प्राचीला संस्कृतीरक्षणाचे(??) काम करायचे आहे पण तिच्याच future बद्दल ती किती insecure & confused आहे हे आपल्याला तिच्या चेहऱ्या वरून स्पष्ट दिसतं.


           एक मुलगी हे सांगते कि देशाला मुस्लिमांपासून धोका आहे पण ती स्वतः हे हि सांगते, "कि शाळेत असतात माझे २ मुस्लिम मित्र होते आणि आम्ही एकत्र खेळायचो. पण आता आम्हाला 'सत्य' काय हे कळायला लागलय आमचे विचार 'develop' होत आहेत. हे विचार धुसर होऊ नयेत म्हणून दरवर्षी हे पेट्रोल टाकण्यासाठी मी कॅम्प मध्ये येइन." (खरंच development  होतीये !!??).  एक टीचर(!!??) त्यांना तुम्ही लग्न करा, बाहेर पडून काम करणे हि आपली संस्कृती नाही. मुलगी म्हणून तुमचा कमकूवत पणा लपवता येतो का?? हे विचारून त्यांना motivate करते कि demotivate करते हेच कळत नाही. Bollywood Actress या तुमच्या idol असणं किती चुकीचं आहे हे ऐकल्यावर सुद्धा शेवटच्या दिवशी त्या मुलींना जे पट्टे घालायला दिले जातात ते घेतल्यावर त्या मुलींच्या 'Miss World' सारख्या भावना लपत नाहीत. शेवटच्या दिवशी 'तयार' होताना 'मुली' या स्वभावाने 'मुलीच' आहेत हे प्रकर्षाने जाणवते. पण rally च्या वेळी त्यांचे विचार हे देशाला कुठेल्या मार्गावर घेऊन जाणार आहेत हा प्रश्न सतत टोचत राहतो.

         इकडे person ते personality बनण्याचा मार्ग हि तितकाच अवघड असलेला दिसतो.त्यांचा हजरजबाबीपणा इत्यादी ना  मार्क देऊन विजेते ठरवले जातात.  Beauty Contest मध्ये सौंदर्य दाखवणं हे चूक आहे. ही आपली संस्कृती नाही असं त्रीवेदिजी म्हणतात. प्राची ला ही फालतुगिरी वाटते. इथे  "जागो तो इक बार हिंदू जागो तो…"  अशा घोषणा देणाऱ्या, परंपरेला जपणाऱ्या (??) हातात शस्त्र घेऊन देश वाचवायला (??) निघालेल्या मुली दिसतात आणि contest results च्या काही क्षण अगोदर ईश्वराचे स्मरण करणाऱ्या confident मुली दिसतात असा विरोधाभास बऱ्याचवेळा या फिल्म मध्ये दिसतो. जे दिग्दर्शकाचं कसब आहे.


    साध्वी प्रद्न्यासिंह व्हायचं ठरवणारी 'प्राची' आणि स्वत:ची dignity, morals आणि values ची किंमत मोजून (प्रसंगी स्वत:ला त्रास करून घेऊन) स्वतःची ओळख निर्माण करु पाहणारी 'beauty contestant' रुही सिंग'. शेवटी प्राची हे मान्य करते की, "वडिलांचे खूप उपकार आहेत, माझ्या जन्मानंतर मी मुलगी असुनही त्यांनी मला मारूनं टाकलं नाही". रुही beauty contest जिंकते किवा हरते या पेक्षा contest संपल्यावर ती आणि प्राची या दोघी भविष्याची काळजी करत एकाच platform वर उभ्या असलेल्या वाटतात.

    फिल्म संपल्यावर एका elder lady ला मी त्याचं मत विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, Its an eye opener. Excellent work done by director Nisha Pahuja - "ती रुही beauty contest मध्ये स्वत:ला त्रास करून घेऊन ओळख बनवायची स्वप्न पहातीये आणि त्या दुर्गावाहिनी मध्ये शस्त्र हातात घेऊन लोकांना मारायची भाषा करणाऱ्या मुली दिसतात.पालक त्यांना अशा camps मध्ये पाठवतात (!!). विचारांचं शस्त्र वापरून ते त्या मुलींमध्ये संस्काराचं बाळकडू (कि विष) पेरताएत असं  दिसतं. मग आपण खरंच DEVELOP होतोय का?? " माणुसकी नावाची गोष्ट ही 'गोष्ट' झालीये का?? या पुढे या मुली कशा वागतील?? आम्हाला कधी अस शिकवलं नाही आमच्या पालकांनी. सगळे मिळून राहायचे. हे काहीतरी १९९० नंतर  communism चं fad आलं. ती मुलगी पुढच्या पिढीला काय शिकवण देईल??....." - त्या lady चं मी नाव सांगणार नाही. काय आहे ना, नावात माणूस धर्म शोधतो.

How will 'she' respond to the world before her??
Title चा हा दुसरा अर्थच जास्त विचार करायला लावतो. Thanks to my Friend 'Gaurav' who  suggested  me to watch this film.
In my opinion - Must watch. Brilliant editing and thoughtful direction and as a spectator I can say its the sad part of the world before us. (सहज असा विचार आला कि जर प्राची ला beauty contest मध्ये आणि रुही ला दुर्गा वाहिनी च्या camp मध्ये टाकलं तर काय होईल??)

https://www.youtube.com/watch?v=umjDyRaikqQ

Sunday, 8 December 2013

Learning Shakespeare........

A Big Challenge.........

Sunday, 18 August 2013

 Pahayla nakki ya...

For tickets contact :

Swapneil: 9822263318
Zuben:9860078606

Note: Balgandharve chya show che thodech free passes rahile aahet.

Tuesday, 19 February 2013

"Parivrajak Narendra" (Narendra in search of...)

Hi Friends, I am performing a lead role in a play
"PariVrajak Narendra" (Narendra in search of...) based on Swami Vivekananda's life and message to all Indians.
on this Friday 22nd Feb 2013.
@9.00pm
@Bharat Natya Mandir, Sadashiv Peth, Pune
ticket Rs. 50/- only

Make the show more precious with your presence. :)

Sunday, 5 August 2012

Kusumanjali

What an amazing show...!!
Still having the warm feeling of Kusumagraj's supperb Poetry and Nayta Wachan.

Friday, 6 January 2012

अनाथ" प्रथम पारितोषिक

कामगार कल्याण नाट्य स्पर्धा २०११ : "अनाथ"
नाटक :  प्रथम पारितोषिक  
व इतर ७ पारितोषिके.
Prize distribution today. Will upload the details very soon.
Cheeeeeeeeeerrrrrrrrrrrrrssssssssssss.......!!!! :-)