पुणे ५२ -
नावावरून तसा काहीच विशेष बोध न होणारा सिनेमा म्हटला कि आपल्याला तो विशेष वाटू लागतो. सिनेमाची release date हि १२. १२. १२ होती त्यामुळे साहजिकच हा सिनेमा पहायची उत्सुकता जास्त होती. काही दिवसांपूर्वी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता हा सिनेमा पहिला. 'नॉआर फ़ील्म' या प्रकारात हा सिनेमा येतो (म्हणजे काय?)
सिनेमाचा काळ हा ९०-९५ च्या दशकात घेऊन जातो (तसं नसतं तरी काही विशेष फरक पडला नसता म्हणा). अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) नावाच्या detective (तो हि पुण्यात राहणारा!!) ची हि कथा म्हणजे त्याच्या आयुष्यातील काही घडामोडी आणि 'त्या' घडामोडींचा अमर च्या व्यक्तिगत आयुष्यावर होत जाणार 'परिणाम'. अमरचं love marriage. त्याची बायको प्राची (सोनाली कुलकर्णी Sr. and my favorite) हिने त्याच्या typical घरेलू housewife चं काम अतिशय सुंदर केले आहे. अमर ला 'job' नसल्याने तिची पैशासाठी होणारी चिडचिड, आईशी बोलताना अमर ची बाजू घेणे, अमरवर असलेलं प्रेम, बायकी राग, भांडण या सगळ्या emotions तिने खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत. (अमर च्या character ला यामुळेच कदाचित जास्त धार आली असावी)
स्वभावाने साधा आणि सरळ असणारा अमर बायकोच्या किट्किटिला कंटाळतो. त्याला extra marital affairs चे पुरावे शोधण्याची केस मिळते. त्यातून पैसेही मिळतात पण पोलसांकडून सुटण्यासाठी त्याला तेच पैसे द्यावे लागतात. (इन्स्पेक्टर चं काम छोटच पण अप्रतिम I think he is Shrikant Yadav) म्हणजे एवढी मेहनत करूनही हाती काहीच नाही. यातून नेहाची (सई ताम्हणकर) केस घेतल्यानंतर अमर हळूहळू तिच्यामध्ये गुंतत जातो. प्राची त्याचा इगो प्रचंड दुखावते. अमर नेहा कडे जातो आणि त्याचा पाय घसरतो (इथे काही scenes मध्ये intimacy दाखवली गेली आहे पण तीही फक्त गरज म्हणून. Good निखिल ) त्यातून पुढे त्याच्या मनाचा गोंधळ वाढत जातो. ती चिडचिड, तो guilt गिरीश कुलकर्णी ने खूप छान साकारला आहे. तो guilt वाढत जाताना दिग्दर्शक म्हणून निखिल महाजन याने केलेले बदल खूप सूचक आहेत. पुढे त्याला होणारे भास आणि नेहाचं रहस्य उलगडत जातं (?) अशाच एका ठिकाणी सिनेमा येउन संपतो.
सिनेमामध्ये कॅमेरा angles खूप छान वापरलेत. त्याचं नाणं, पक्ष्याचं घरटं यासारखे symbols गूढ effect आणतात. डार्क आणि gray shade चा वापर अमरची मनस्थिती दाखवण्यात केला आहे. globalization मुळे गिरीश बदलतो यापेक्षा त्याच्या स्वतःकडून असणार्या अपेक्षा, स्वप्न, जबाबदार्या आणि गुंतलेलं, गोंधळलेलं मन यामुळे तो बदलतो हे कारण जास्त संयुक्तिक वाटतं. नेहाच्या 'exit' नंतर सिनेमा आता थांबेल आता थांबेल असा वाटून जातं. पण दिग्दर्शकाला उघाच त्याच्या आयुष्यात पुढे काय होईल हे दाखवायची (आणि पर्यायानं आपल्याला बघायची) excitement आवरता आली नाही. "आता detective म्हटल्यावर हाणामारीचे प्रसंग असायलाच हवे, तो नंतर पोलिसांसोबत काम करतो, पैसेवाला होतो" - हे समीकरण देखील बळच दिल्यासारखं वाटतं. पण त्याचा, घराचा, family चा एकूण changeover दाखवताना वापरलेलं VFX आणि Animation मस्त वाटतं. हाणामारीची काही दृश्ये - camera आणि editing मधल्या 'effects' मुळे एखाद्या hollywood पटासारखी वाटतात (हेच विशेष)
Background score, theme music छान जमलय. सुरवातीला दाखवलेले shadow मधले shots गूढता निर्माण करतात. पण पूर्ण सिनेमाभर ती नाही. (दिग्दर्शकाला तशी गरज वाटली नसेल म्हणा पण detective चा सिनेमा म्हणून आपली एक इच्छा… बास…) अमर जर detective नसता तर प्रेक्षक त्याच्याशी जास्त relate करू शकले असते का?? अमरचा तणाव इतका जास्त वेळ का दाखवला?? "Find the hero within you" अशी tagline का?? असे काही छोटे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन निखिल ने सिनेमा संपवला आहे (का?)
विशेष : अमर रात्री बायको शेजारी झोपलेला असताना त्याच्याच कॉटवर शेजारी आपल्याला नेहा सुद्धा दिसते या क्षणी घेतलेला टॉप angle pan shot खूप भारी झालाय. सर्वच पात्रांचे अभिनय उत्तम. कमी artists मध्ये केलेला हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा एकवेळ बघण्यासारखा नक्कीच आहे.
Youtube लिंक पुणे ५२ - तुमचे views कळवा.
Director: Nikhil Mahajan
Cast: Sonali Kulkarni, Girish Kulkarni, Sai Tamhankar, Bharti Achrekar, Kiran Karmarkar